Pandharpur | विठुरायाचे मंदिर भक्तांसाठी खुले, ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांना मंदिरात प्रवेश नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर समितीकडून एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रोज 10 हजार भाविकांनाच विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेता येणार आहे. 

पंढरपूर : घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळं उघडणार आहेत. पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही 7 ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. मंदिर समितीची बैठक आज पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर समितीकडून एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रोज 10 हजार भाविकांनाच विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेता येणार आहे. घटस्थानपेपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुलं असणार आहे. रोज 10 हजार भाविकांना मुख दर्शन घेता येणार आहेत. त्यातील 5 हजार भाविकांना ऑनलाईन पासद्वारे दर्शन घेता येईल. तर 5 हजार भाविकांना ऑफलाईन पद्धतीने दर्शन मिळणार आहे. तर पंढरपूरमधील भक्तांना सकाळी 6 ते 7 असा वेळ राखून ठेवण्यात आलाय. प्रत्येक तासाला 1 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान 65 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आलीय. मंदिर प्रशासनाकडून मंदिर उघडण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI