मंत्री पदासाठी अजून माझ्यात पात्रता नसेल

माध्यमांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर व त्यांच्या नावाचा समावेश का झाला नाही यावर विचारले असता त्या म्हणाल्या की पक्षातील वरिष्ठांना माझ्यात अजून कुवत वाटत नसेल त्यामुळे मला मंत्रिमंडळात समावेश मिळाला नसेल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

महादेव कांबळे

|

Aug 11, 2022 | 5:40 PM

शिंदे-फडणवीस सरकारचा तब्बल 40 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, मात्र  या मंत्रिमंडळातही अनेक चर्चेतील नावांचा समावेश झाला नसल्याने राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्याविषयी बोलताना भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. माध्यमांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर व त्यांच्या नावाचा समावेश का झाला नाही यावर विचारले असता त्या म्हणाल्या की पक्षातील वरिष्ठांना माझ्यात अजून कुवत वाटत नसेल त्यामुळे मला मंत्रिमंडळात समावेश मिळाला नसेल असंही त्यांनी यावेळी सांगितले. राजकीय चर्चा होत असल्या तरी वरिष्ठ पातळीवरून झालेले निर्णय मी मान्य करते असंही त्यांनी यावेळी सांगितले. आज रक्षाबंधन असल्यामुळे नव्या मंत्रीमंडळातील नव्य मंत्र्यांना मी शुभेच्छा आधीच दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें