Pankaja Munde Shayari | तुम मुझे कब तक रोकोगे, भगवान भक्तीगडावरुन पंकजा मुंडे LIVE

Pankaja Munde Shayari | तुम मुझे कब तक रोकोगे, भगवान भक्तीगडावरुन पंकजा मुंडे LIVE

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 5:42 PM

तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?, अशा शायराना अंदाजात पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका भगवानबाबांच्या भक्तांसमोर मांडली.

आज विजयादशमी आणि दसरा आहे. दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी उन्हा ताणात घरची पुरणपोळी सोडून मैदानात उपस्थित झालात त्याबद्दल नतमस्तक होऊन पाया पडते. तुमच्या प्रेमासमोर माझी झोळी कमी पडतेय. भगवान बाबांची भक्ती आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची शक्ती ही वैभवाची पंरपरा सुरु ठेवण्याचं श्रेय तुम्हा सर्वांना आहे. आदरणीय महादेवराव जानकर यांनी आताच भाषण केलं. आपल्या लाडक्या खासदार प्रीतम ताईंना भाषण केलं. मंचावर खासदार सुजय विखे पाटील, माझ्या वडिलांचे अत्यंत लाडके कर्डिले साहेब, तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश आण्णा धस, प्रविणजी घुगे, मोहन दादा, मंचावर उपस्थित धोंडे साहेब, नमिता मुंदडा, एवढे नावं घेत बसलो तर बाबा इथेच संध्याकाळ होईल. किती देखणा कार्यक्रम आहे. तुम्ही गप्प बसलात तर माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल, असं उपस्थित समुदायाला पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंनी शायराना अंदाजात एकप्रकारे पक्षांतर्गत आणि पक्षातील विरोधकांना देखील इशारा दिलाय.

तुम मुझे कब तक रोकोगे

मला वाटलं मी इथे येऊ शकणार नाही. माझ्या मनात चारोळ्या आल्या. तुम मुझे कब तर रोकोगे? जानकर साहेब भाषण करताना इंग्रजीत बोलत होते. ओबीसी माणूस पेटला तर इंग्रजीत बोलतो. मध्येच हिंदी बोलतात. कारण त्यांना देशाची लिडरशीप आहे. तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?, अशा शायराना अंदाजात पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका भगवानबाबांच्या भक्तांसमोर मांडली. पंकजा मुंडे यांनी या माध्यमातून त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलंय. मात्र, पंकजा मुंडे यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केल्यानं पक्षांतर्गत की विरोधी पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे.