Nanded Election : आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, पंकजा मुंडेंनी चॅलेंज देत विरोधकांना फटकारलं
देशामध्ये, राज्यांमध्ये आणि आत्ताच झालेल्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अव्वल पक्ष हा भाजप आहे, त्याचबरोबर आमचा जाहीरनामा हा लोकांचा विश्वास आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं म्हणत पंकजा मुंडेंनी विरोधकांवर टीका करत थेट आव्हान दिलं आहे.
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकींवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचे पाहायला मिळतंय. अशात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केलंय, माझ्या पक्षाचा जाहीरनामा चांगला आहे, म्हणूनच देशामध्ये, राज्यांमध्ये आणि आत्ताच झालेल्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अव्वल पक्ष हा भाजप आहे, त्याचबरोबर आमचा जाहीरनामा हा लोकांचा विश्वास आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं म्हणत पंकजा मुंडेंनी विरोधकांवर टीका करत थेट आव्हान दिलं आहे.
पुढे पंकजा मुंडे असंही म्हणाल्या, समोर कोणताच पक्ष नाही अशी निवडणूक तर नसते, लोकशाहीत आव्हानं असायलाच हवीत, कोणी कीतीही बलाढ्य पक्ष असुदेत तरी आम्ही आमच्या मेरीटवर निवडणुका लढवू, असं वक्तव्य मुंडेनी केलयं. त्याचबरोबर राज्यभरातील महानगरपालिकेत भाजपचाच महापौर व्हावा यासाठी आम्ही निवडणुका लढतोय हाच आमचा उद्देश आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा

