Thane Election : पोलिसानंच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेलं? ठाण्यात अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब! मनसे-ठाकरे गटाचे गंभीर आरोप
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून दबावाखाली उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा मनसे आणि ठाकरे गटाचा आरोप आहे. अनेक उमेदवार गायब झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याविरोधात मनसे नेते अविनाश जाधव उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून, पुरावे निवडणूक आयोगाला देण्याची तयारी दर्शवली आहे.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला, तसेच पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत सत्तेचा धाक दाखवण्यात आला. मनसे नेते अविनाश जाधव यांनी दावा केला आहे की, ठाण्यात उमेदवारी अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब झाले आहेत. एका गंभीर आरोपानुसार, पोलीस अधिकारीच काही उमेदवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेऊन जात असल्याचे म्हटले आहे. अविनाश जाधव यांनी विक्रांत घाग नावाच्या उमेदवाराचे उदाहरण देत, पोलीस अधिकाऱ्याने त्याला शिंदे यांच्या घरी नेल्याचा व्हिडिओ पुरावा असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात मनसे आज उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून, निवडणूक आयोगाला पुरावे देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारीही मनसेने दर्शवली आहे.
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा

