Ganesh Chaturthi 2023 | वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती; बघा व्हिडीओ
VIDEO | विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा पर्यावरणपूरक अनोखा झाडाचा बाप्पा साकारला, परभणीच्या मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा उपक्रम?
परभणी, २२ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात घरोघरी गणपती बाप्पांचे आगनम झाले आहे. अशातच राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. यंदा सर्वच ठिकाणी पर्यावरणस्नेही सजावट करण्याचा कल घरगुती गणपती किंवा सार्वजनिक गणेश मंडळांचा असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, परभणीच्या मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा पर्यावरणपूरक आगळावेगळा झाडाचा गणपती तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी शाळेतील कदंब वृक्षाला गणपतीची सजावट करून त्यापासून झाडाचा गणपती तयार केला आहे. तर गणपतीच्या समोर विविध प्रकारच्या रोपट्यांची सजावट करून बाजूला विविध वृक्षांच्या कुंड्या ठेवण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा पर्यावरणपूरक आणि आगळावेगळा झाडाचा गणपती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने परभणीकर आणि भाविक भेट देत आहेत.
Published on: Sep 22, 2023 10:25 AM
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
