‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचं वर्चस्व; 12 जागांवर विजय
Bazar Samiti Election Result 2023 : भाजप आणि राष्ट्रवादीच्या थेट लढतीमध्ये भाजपचा विजय; पाहा व्हीडिओ...
परभणी : भाजप आणि राष्ट्रवादीची थेट लढतीमध्ये परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरीमध्ये भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं. भाजपने 12 जागांवर विजय मिळवला. तर महाविकासआघाडीला सहा जागांवर यश मिळालंय. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या गटाने बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दमदार विजय मिळवला आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार मेघना बोर्डीकर यांनी दमदार विजय मिळवला आहे. बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपने 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांना मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे आमदार मेघना बोर्डीकरांनी या बाजारसमितीत आपलं वर्वस्व सिद्ध केलं आहे.
Latest Videos
Latest News