संसद भवन ते सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव, कोविडचा धोका वाढला

नवी दिल्ली मध्ये संसदेच्या 400 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. सुप्रीम कोर्टातही कोरोनाचा धोका वाढला असल्याचं समोर आलंय. सुप्रीम कोर्टातील 150 रजिस्ट्रार कोरोना संक्रमित झाले असल्याची माहिती आहे. 

देशभरात कोरोना विषाणू संसर्गामध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. नवी दिल्ली मध्ये संसदेच्या 400 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. सुप्रीम कोर्टातही कोरोनाचा धोका वाढला असल्याचं समोर आलंय. सुप्रीम कोर्टातील 150 रजिस्ट्रार कोरोना संक्रमित झाले असल्याची माहिती आहे.  सहा न्यायमूर्तींना देखील कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.  नवी दिल्लीत कोरोनाचे संकट वाढले असून निर्बंधात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी देशभरात 1 लाख 59 हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI