तर आज हे लोक इथे दिसले नसते; लोकसभेत राऊतांचा सत्ताधाऱ्यांना खोचक टोला
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी सरदार पटेलांच्या नेतृत्वाच्या अभावाचा उल्लेख करत सध्याच्या राजकीय परिस्थितीचा समाचार घेतला. राऊत यांनी नेहरूंच्या योगदानाचेही स्मरण केले आणि आरएसएसवर सरदार पटेल यांनी घातलेल्या बंदीचा उल्लेख केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. राज्यसभेत सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जर सरदार वल्लभभाई पटेल आणखी १० वर्षे जगले असते, तर आज हे लोक इथे दिसले नसते, असा खोचक टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
राऊत पुढे म्हणाले, पंडित नेहरू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा इतर कोणी राजीनामा देईल का? देशाच्या गृहमंत्र्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. या देशात उपराष्ट्रपतींचा राजीनामा २४ तासांत घेण्यात आला, कारण ते तुमच्या म्हणण्यानुसार चालत नव्हते. पण पहलगाममध्ये २६ जणांच्या हत्येनंतरही कोणी राजीनामा दिला नाही, ना कोणाने माफी मागितली.
ते म्हणाले, पंडित नेहरूंमुळे तुम्ही आज इथे बसू शकता, यासाठी तुम्ही त्यांचे आभारी असायला हवे. सरदार पटेल यांना पंतप्रधान न बनवणे ही आमची ऐतिहासिक चूक होती. सरदार पटेल यांनीच सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घातली होती. जर ते आणखी १० वर्षे जिवंत असते, तर आजचे हे चित्र दिसले नसते.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

