Sharad Pawar | राज्यपालांच्या पत्रावर पवारांनी बोलणं टाळलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

सत्ताधारी तसेच विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या सर्व प्रकरणावर बोलणं टाळलं आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील लेटर वॉरवर बोलण्याऐवजी त्यांनी क्रिकेट, क्रिकेट खेळाचा विकास तसेच त्यांची मुंबईबद्दलची आस्था यावर बोलत पत्रकारांच्या प्रश्नांवर षटकार ठोकले आहेत. 

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या पत्राला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्राद्वारेच सडेतोड उत्तर दिलंय. ठाकरे आणि कोश्यारी यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपचे बडे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले आहेत. तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांपासून ते आमदार, खासदार असे सगळेच भाजपला चोख प्रत्युतर देण्यात व्यस्त आहेत. सत्ताधारी तसेच विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या सर्व प्रकरणावर बोलणं टाळलं आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील लेटर वॉरवर बोलण्याऐवजी त्यांनी क्रिकेट, क्रिकेट खेळाचा विकास तसेच त्यांची मुंबईबद्दलची आस्था यावर बोलत पत्रकारांच्या प्रश्नांवर षटकार ठोकले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI