Nawab Malik | पहचान कौन? असं म्हणत मलिकांकडून समीर वानखेडेंचा जुना फोटो ट्विट

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांचा अत्यंत तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर पैचान कौन? असा सवाल केला आहे. तसेच काही कागदपत्रेही ट्विट करून यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असंही म्हटलं आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांचा अत्यंत तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर पैचान कौन? असा सवाल केला आहे. तसेच काही कागदपत्रेही ट्विट करून यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असंही म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही फोटो व्हायरल झाला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबतचे दोन ट्विट केलं आहे. पहिल्या ट्विटमध्ये मलिक यांनी वानखेडे यांचा सिंगल फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अत्यंत जुना आहे. अगदी तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर मलिक यांनी पैचान कौन? असा सवाल केला आहे.

Published On - 11:26 am, Mon, 25 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI