Rajesh Tope | कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना निर्बंधात सूट नाही : राजेश टोपे

गणेश उत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोरोनाच्या निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय जनहीतासाठी शासनाच्या या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सर्व नियम विचार करूनच घेतले जातात, त्यामुळे यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन टोपे यांनी केले आहे.

गणेश उत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोरोनाच्या निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय जनहीतासाठी शासनाच्या या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सर्व नियम विचार करूनच घेतले जातात, त्यामुळे यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन टोपे यांनी केले आहे. कोकणात येणाऱ्या नागरिकांना आर टी पी सी आर आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आलेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दोन डोस घेणे बंधनकारक राहणार असून हे नियम चाकरमान्यांनी पाळावे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.राज्यात सरकारच्या नकारानंतर देखील दहीहंडी साजरी करणार या मनसेच्या निर्णयावर देखील टोपे यांनी भाष्य केलं.सण -उत्सव सर्वांनाच्याच आवडीचे असतात मात्र नियमात राहूनआणि शासनाच्या नियमांचं पालन करून  दहीहंडी साजरी करावी असं आवाहन टोपे यांनी केलं.मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजप राज्यभर शंखनाद आंदोलन करत आहे.मात्र सध्या सर्वांनी जनहिताच्या नियमांचं पालन करावं असंही त्यांनी सांगितलं.राज्यात कोरोना बाधितांचा आकडा घटत असून मृत्यूचा आकडा देखील घटत आहे अशी माहिती टोपे यांनी दिली.जो डॉक्टर कोरोना बाधितांची हेळसांड करतो त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल अशी माहिती टोपे यांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI