Pravin Darekar | ड्रग्ज, गांजाची बाजू कोण घेतं, जनतेला माहिती आहे : प्रवीण दरेकर

ड्रग्ज, गांजा याची बाजू कोण घेतं हे महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे. सुशांतच्या प्रकरणात काय झालं हे सर्वांना माहीत आहे. ते काढायला भाग पाडू नका. कुणाच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली आहे हेही सर्वांना माहीत आहे

प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला. तुमच्या पक्षातील उपऱ्यांची संख्या आणि भाजपमधील उपऱ्यांची संख्या एकदा जनते समोर येऊ द्या, असं आव्हान देतानाच आजच्या मंत्रिमंडळात कोण आहेत? उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे काय 1966 पासूनचे शिवसैनिक आहेत काय? प्रियंका चतुर्वेदी या पदर खोवून आंदोलनात उतरणाऱ्या रणरागिणी आहेत का? उर्मिला मातोंडकर कोण आहेत? या लोकांनी कंबर कसून शिवसेनेसाठी आंदोलने केली आहेत का? मग इतरांना उपरे म्हणणं कितपत योग्य आहे? असा सवाल दरेकर यांनी केला.

राज्यात सध्या अत्यंत खालच्या पातळीवरची टीका सुरू आहे. आमचे नेते गांजा घेतात की काय असं बोललं जात आहे. ड्रग्ज, गांजा याची बाजू कोण घेतं हे महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे. सुशांतच्या प्रकरणात काय झालं हे सर्वांना माहीत आहे. ते काढायला भाग पाडू नका. कुणाच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली आहे हेही सर्वांना माहीत आहे. कोण गांजा, ड्रग्जची पाठराखण करतं हे सर्वांना माहीत आहे, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI