भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील नवे दर किती?
अगोदरच गॅस दरवाढ आणि गॅसच्या पुरवठ्यातील अनियमिततेमुळे ग्राहक हैराण झाला आहे. देशातील अनेक शहरांसह गावांमध्ये गॅससाठी अजूनही लांबच लांब रांगा आहेत. त्यातच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेवर आणखीच ताण येणार आहे.

इराण- अमेरिका संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा फटका तेल उत्पादक कंपन्यांना बसत आहे. परिणामी ग्राहकांच्या खिशावर जोर पडणार.
ताज्या माहितीनुसार, देशभरातील पेट्रोल डिझेलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे, मुंबईत पेट्रोलचे दर 106.50 रुपये आहेत, तर डिझेलसाठी नागरिकांना 93 रुपये मोजावे लागणार आहेत. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. पुण्यात दर 106.95 रुपयांवर आहेत, तर अमरावतीत 108.24 रुपयांवर आहेत. रत्नागिरीत पेट्रोलची किंमत 108.63 रुपयांवर पोहोचली असून नागपुरात हा आकडा 107.18 रुपयांवर आहे.
एकूणच आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका जगभरात बसत आहे. त्यात भारतातील जनतेला याच्या झळा बसत आहेत. रोजच्या जीवनात नागरिकांसाठी अविभाज्य बनलेल्या वाहनांच्या बाबतीत ही चिंताजनक बाब आहे. दरम्यान, फक्त भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे.
Published on: May 15, 2026 12:05 PM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...