Video: फलटणच्या चिमुकल्या स्वराची आश्चर्यकारक कामगिरी.. एका मिनिटात 100 पुशअप्स…!

स्वरा योगेश भागवत Swara Bhagwat या सहा वर्षीय चिमुरडीने एका मिनिटात तब्बल 100 पुश अप्स मारुन सर्वांना आश्चर्यचकीत केले. (Swara Bhagwat 100 Pushups )

सातारा: सहा वर्षांची चिमुरडी काय करु शकते तर ती हट्ट करुन काहीतरी वस्तू मागू शकते किंवा खेळण्यासाठी मागे लागू शकते. मात्र, फलटण तालुक्यातील गोखळी येथील स्वरा योगेश भागवत या इयत्ता पहिलीतील सहा वर्षीय चिमुरडीने एका मिनिटात तब्बल शंभर पुशअप्स मारुन सर्वांना आश्चर्यचकीत केले. स्वराचं या कामगिरीसाठी सर्वत्र कौतुक होत आहे. (Phaltan Six year old Swara Bhagwat complete hundred pushups in one minute)