Special Report | शिंदेंचे 2 बंडखोर,फोनकॉलमुळे जीवाला घोर
सर्व मोठ्या नेत्यांच्या भूमिकांमुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचीही गोची झालीय. एक व्हायरल क्लिपनुसार धुळ्यातल्या एका युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला शिंदे समर्थकानं फोन करुन शिंदे गटात येण्याचं आवाहन केलं.
मुंबई : बंडखोर आमदारांमागे कार्यकर्त्यांच्या फोनचं ग्रहण लागलंय. संतोष बांगरांनंतर पैठणचे आमदार संदीपान भुमरे त्यात आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरेंचा काल पैठणला दौरा झाला. त्या दौऱ्याला गर्दी झाल्यामुळे एका कार्यकर्त्यानं संदीपान भुमरेंनी(sandipan bhumare) कशामुळे ठाकरेंची साथ सोडल्याचा प्रश्न त्यांना केला. त्यावर मात्र संदीपान भुमरे चिडले. शिवसैनिकांचा आग्रह आणि हिंदुत्वासाठी आपण शिंदे गटात गेल्याचं संतोष बांगरांनी(santosh bangar) म्हटलंय. मात्र शिंदे गटात जाण्याआधी बांगर यांचाच एक कार्यकर्ता, बांगर यांच्याच उपस्थितीत आणि ते सुद्धा जाहीर सभेत शिंदे. गटाकडून पैशांची ऑफर आल्याचं म्हटल होता. पण आता संतोष बांगर स्वतःचं केलेल्या त्या भाषणाला एकप्रकारे खोटं ठरवतात.आता याच कथित शंभर कोटींमुळे काही कार्यकर्ते बांगर यांना फोन करुन उसनवारीच्या स्वरुपात पैसे मागू लागले आहेत. या सर्व मोठ्या नेत्यांच्या भूमिकांमुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचीही गोची झालीय. एक व्हायरल क्लिपनुसार धुळ्यातल्या एका युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला शिंदे समर्थकानं फोन करुन शिंदे गटात येण्याचं आवाहन केलं. मात्र त्या दोघांमध्येही नेमकं कोण योग्य आणि कोण खरं यावरुन वादविवाद झाला.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

