Narendra Modi | देशात 100 कोटींचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण, मोदींनी देशवासियांचे मानले आभार

भारताने आज एक नवा इतिहास रचला आहे. देशाने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत.

देशामध्ये जवळपास गेल्या  दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज एक नवीन इतिहास भारताने रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI