बदलापुरात शिवसेनेकडून सर्वात मोठी लसीकरण मोहीम, आतापर्यंत 17 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण

निनाद करमरकर

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 6:20 PM

शिवसेनेच्या या खासगी कोरोना लसीकरण मोहिमेत प्रत्येक शनिवारी 2 हजार लोकांना लस दिली जात आहे. बदलापूर शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. मात्र त्या तुलनेत शहरातील सरकारी लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या लसींचे प्रमाण अगदीच तोकडे आहे.

बदलापुरात शिवसेनेकडून सर्वात मोठी लसीकरण मोहीम, आतापर्यंत 17 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण
लसीकरण कमी झाल्यास गावचे सरपंच पद धोक्यात

बदलापूर : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाला गती देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा प्रमाणात पुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील सरकारी लसीकरण केंद्रावर लसींचा ठणठणाट आहे. असे असताना बदलापूर शहराला कोरोना लसीकरणात आघाडी मिळवून देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शहरात शिवसेनेने आतापर्यंतची सर्वात मोठी खासगी कोरोना लसीकरण मोहिम राबवून 17 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. शिवसेनेच्या या पुढाकारामुळे शहरातील कोरोना लसीकरणाला चांगलीच गती मिळाली असून नजिकच्या काळात सर्व बदलापूरकरांचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (The biggest vaccination campaign by Shiv Sena in Badlapur)

प्रत्येक शनिवारी दोन हजार लोकांना लस

शिवसेनेच्या या खासगी कोरोना लसीकरण मोहिमेत प्रत्येक शनिवारी 2 हजार लोकांना लस दिली जात आहे. बदलापूर शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. मात्र त्या तुलनेत शहरातील सरकारी लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या लसींचे प्रमाण अगदीच तोकडे आहे. कारण सरकारी केंद्रांवर प्रत्येक दिवसाला अवघ्या 100 ते 200 लसींचा पुरवठा होतो. त्यातही आठवड्यातील 4 दिवस लसींअभावी सरकारी लसीकरण मोहिम बंदच असते. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी बदलापुरात सर्वात मोठी खासगी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत दर शनिवारी बदलापुरात दोन ठिकाणी लसीकरण मोहीम राबवून दिवसाला 2 हजार लोकांचे लसीकरण केले जात आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत तब्बल 17 हजार बदलापूरकरांचे खसगी लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

लसीच्या प्रत्येक डोससाठी शिवसेनेच्या खिशातून 280 रुपये

लसीकरणासाठी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या वतीने यंत्रणा उपलब्ध करून दिली जाते. कोव्हीशिल्ड ही लस याठिकाणी दिली जात आहे. या लसीची किंमत 780 रुपये असताना शिवसेनेकडून 500 रुपयांत ही लस दिली जात आहे. उर्वरित 280 रुपये शिवसेनेकडून भरले जातात. बदलापूर शहर चाकरमान्यांचे शहर असल्याने लोकांच्या सोयीनुसार सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी आपण ही मोहीम ठेवत असून त्याचा लोकांना मोठा फायदा होत आहे, असे शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी सांगितले. केंद्र सरकारची लसीकरण मोहीम अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या या लसीकरणाच्या धडाक्यामुळे बदलापूर शहर हे ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झालेले शहर ठरले आहे. याच अनुषंगाने इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची खासगी कोरोना लसीकरण मोहिम राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (The biggest vaccination campaign by Shiv Sena in Badlapur)

इतर बातम्या

कमी किंमतीत ढासू फीचर्स, Royal Enfield ची शानदार बाईक या महिन्यात लाँच होणार

भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, मुंबई बाजार समितीकडे ग्राहकांची पाठ, हे पहिल्यांदाचं घडतंय, व्यापाऱ्यांचं मत

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI