मनसे नेते गजानन काळेंवर आता पत्नीचा भ्रष्टाचाराचा आरोप; राज ठाकरेंना लिहिले पत्र

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 6:01 PM

संजीवनी काळे यांनी तीन दिवसांपूर्वी गजानन काळे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाची तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गजानन काळे यांनी अलिकडे नवी मुंबईच्या राजकारणात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

मनसे नेते गजानन काळेंवर आता पत्नीचा भ्रष्टाचाराचा आरोप; राज ठाकरेंना लिहिले पत्र
गजानन काळे आणि संजीवनी काळे

नवी मुंबई/ अक्षय मंकणी : मनसेचे डॅशिंग युवा नेते म्हणून नावारुपाला आलेले नवी मुंबईतील गजानन काळे यांच्या पत्नीने आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. माझ्या पतीने नवी मुंबई महापालिकेच्या वाहन विभागात भ्रष्टाचार केला आहे. येथील एका जागेच्या भरतीसाठी अडीच लाख रुपये घेतले होते. या भ्रष्टाचारामध्ये पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली आहे, असा खळबळजनक आरोप गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज केला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गजानन काळेंवर गंभीर आरोप केले. तसेच पोलिस माझ्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी माझ्यावरच दबाव आणत आहेत. गेले तीन दिवस गजानन काळेंवर कोणतीही कारवाई झालेली नाही. अनेक पत्रकारही मेसेज पाठवून माझ्यावर दबाव आणत आहेत, असेही आरोप संजीवनी काळे यांनी केले आहेत. (MNS leader Gajanan Kale now accused of wife corruption; Letter written to Raj Thackeray)

मनसेकडून न्याय मिळण्याची अपेक्षा

संजीवनी काळे यांनी तीन दिवसांपूर्वी गजानन काळे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाची तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गजानन काळे यांनी अलिकडे नवी मुंबईच्या राजकारणात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. याचदरम्यान पत्नीने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली आहे. मनेसकडून मला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. मला फक्त न्याय हवा आहे. मला आता खरी भिती वाटत आहे. पोलिसांकडून, पत्रकारांकडून दबाव येत आहे. एका पत्रकाराने कॉल करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडूनही मला सेटलमेंटसाठी बोलावण्यात आले होते, असे आरोप संजीवनी काळेंनी आजच्या पत्रकार परिषदेत केले.

पालिकेतील भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बेहिशेबी संपत्ती कमावली

पती गजानन काळे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाहन विभागात भ्रष्टाचार केला आहे. एक जागा भरण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले जात होते. पालिकेतील अनेक अधिकारी त्यांच्यासोबत या भ्रष्टाचारात सामील आहेत. पालिकेचे वॉर्ड ऑफिसर आणि इंजिनिअर यांचे अनेक कॉल्स यायचे. 2008 मध्ये आम्ही संसार चालवताना हिशोब लावायचो. आताच्या घडीला पती गजानन काळे यांनी बेहिशेबी मालमत्ता कमावली आहे, असे संजीवनी काळे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंना पत्र लिहिलेय, पण ते पाठवायचेय!

गजानन काळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी मिळून भ्रष्टाचार केला आहे. मनसे पक्षातील पदाच्या जोरावर त्यांनी हे सगळे केले आहे. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. फक्त ते पत्र अजून त्यांना पाठवलेले नाही. मनसेचे संदीप देशपांडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. पती गजानन यांच्याबरोबर याबाबत भांडणे व्हायची, त्यावेळी प्रत्येक भांडणात मैत्रीकुल संस्थेचे अध्यक्ष किशोर जगताप मध्यस्थी करायचे. राजकारणी चेहरा हा वेगळा असतो. गजानन काळेंच्या सर्व कारभाराला त्या दोन महिला पत्रकारसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत, असेही संजीवनी काळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (MNS leader Gajanan Kale now accused of wife corruption; Letter written to Raj Thackeray)

इतर बातम्या

जेएनपीटीकडून महिलांसाठी विशेष व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरु, 50 लाखांचा निधी मंजूर

ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने ‘पंचरत्नां’चा सन्मान

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI