Video : माझं तिकीट राज्यानं ठरवले नाही, मला पंतप्रधान मोदींनी जबाबदारी दिली, पंकजा मुंडे यांचं विधान
पंकजा मुंडे या नाराज असल्याचे म्हटले जात होते. परंतू यंदा त्यांना भाजपा नेतृत्वाने थेट लोकसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची बहिण प्रीतम मुंडे यांनी दहा वर्षे लोकसभेत काम केले आहे. पंकजा यांना खरेतर राज्यात काम करायचे होते. परंतू आता त्यांना दिल्लीत काम करावे लागणार आहे. यावर त्यांनी आपण बुद्धीने केंद्रात जाण्याचा निर्णय घेतल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी बीडमध्ये काल सभा घेतली. पंकजा मुंडे यांनी माझं तिकीट राज्याने ठरविले नाही. मला देशातील सर्वोच्च नेत्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिकीट दिलं आहे असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. मला लोकसभा लढवायची नव्हती. मी राज्यामध्ये चांगलं काम केलं. तिकीट जाहीर झाल्यानंतर मी बुद्धीने निर्णय घेतला आणि माझं मन कपाटात काढून ठेवलं नाही. तर मन देखील माझ्या सोबतच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. देशाच्या सर्वोच्च नेत्याने माझी उमेदवारी ठरवली आहे. त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलं असेल, असा मला विश्वास आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्या, एवढीच तुम्हाला विनंती करते, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. माझे तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक विचारांचे काहुर उठले की आपण काय करावे आता ? माझ्यावर प्रेम करणारी लोकं बीड जिल्ह्यात नसून संपूर्ण राज्यात आहेत. आज ते टीव्हीवरुन मला बघत आहेत. या सर्व लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
Published on: Mar 23, 2024 06:12 PM
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...

