Shibu Soren Death : झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून अंत्यदर्शन
झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिबू सोरेन हे एक तळागाळातील नेते होते जे जनतेप्रती असलेल्या त्यांच्या अढळ समर्पणामुळे एक जनतेचे नेते बनले. ते विशेषतः आदिवासी समुदाय, गरीब आणि वंचितांना सक्षम करण्यासाठी समर्पित होते.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचं आज निधन झालं. शिबू सोरेन यांच्या निधनाची बातमी कळताच मोदींनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली. शिबू यांचे सोमवारी सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. पंतप्रधानांनी रुग्णालयात जाऊन शिबू यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शिबू सोरेन यांचे पुत्र आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला.
“झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटून शोक व्यक्त केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी समर्पित होते, ज्यासाठी ते नेहमीच लक्षात राहतील.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांनी सोशल मीडियावर झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतचे सांत्वन केले. या भेटीचे काही फोटो मोदींकडून शेअर करण्यात आलेत.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

