PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळेंकडे केली शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस
PM Narendra Modi News : पंतप्रधान मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवादा विरोधातली भूमिका जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ प्रदेशात गेलेलं होतं. हे सगळे खासदार भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खासदारांची भेट घेतली आहे. यावेळीच खासदार सुप्रिया सुळे यांना मोदींनी शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
दरम्यान, प्रत्येक खासदाराचा प्रदेशतला अनुभव देखील यावेळी मोदींनी जाणून घेतला. विरोधी पक्षाच्या खासदारांचे प्रतिनिधीमंडळ प्रदेशात जाणं हा भारताकडून मोठा संदेश आहे. संकट काळात देश दहशतवादाच्या विरोधात एकत्र आहे हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो असल्याचं यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हंटलं

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी

इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला

वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...

राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
