PM Modi | पंतप्रधान मोदींची 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, कर्नाटक बी. एस. येडियुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jul 16, 2021 | 1:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, कर्नाटक बी. एस. येडियुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. कोरोना संकटाच्या काळात सर्वच राज्य सरकारांनी एकमेकांपासून अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. आता आपण तिसऱ्या लाटेच्या टप्प्यावर उभे आहोत. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अजूनही वाढत आहे. हा चिंतेचा विषय आहे, असं मोदी म्हणाले. | PM Narendra Modi Discuss The Situation Of Corona With The 6 States CM

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें