Ukraine मधून आलेल्या विद्यार्थ्यांशी PM Narendra Modi यांनी काय केला संवाद?
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारत एअरलिफ्ट करत आहे आणि त्यांना मायदेशी परत आणत आहे. आतापर्यंत एकूण 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणे वाढवण्यात आली आहेत.
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी वाराणसी येथे युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांशी (Indian Students In Ukraine) संवाद साधला. या विद्यार्थ्यांनी त्यांना आपले थरारक अनुभव सांगितले. हे विद्यार्थी वाराणसी तसेच उत्तर प्रदेशातील इतर भागातील होते. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारत एअरलिफ्ट (Airlift) करत आहे आणि त्यांना मायदेशी परत आणत आहे. आतापर्यंत एकूण 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणे वाढवण्यात आली आहेत. 24 फेब्रुवारीच्या रशियन लष्करी हल्ल्यानंतर युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद असल्याने भारत आपल्या नागरिकांना युक्रेनच्या शेजारील रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंड मार्गे विशेष विमानांद्वारे बाहेर काढत आहे. दोन भारतीय विद्यार्थ्यांचा युक्रेनमध्ये मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृतदेह भारतात आणण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
