AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल

PM Narendra Modi : ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल

| Updated on: May 01, 2025 | 12:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईत दाखल झालेले आहेत. ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटनस्थळी ते दाखल झालेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईत दाखल झालेले आहेत. ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी आज मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. आजपासून चार दिवस ही परिषद असणार आहे. महाराष्ट्र दिनी ते मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज २०२५) उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतं आहे. “कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज” या घोषवाक्याने प्रेरित १ ते ४ मे दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला आता सुरुवात झाली असून याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव देखील या उद्घाटनस्थळी उपस्थित आहेत.

Published on: May 01, 2025 12:21 PM