Breaking | महिला सरपंच मारहाणीबाबत नवा व्हिडिओ समोर, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

मारहाण झालेल्या सरपंच गौरी गायकवाड यांनी राष्ट्रवादीकडून मला त्रास दिला जातो. ग्रामपंचायतीमध्ये काम करताना मला त्रास दिला जातो, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता एक नवा व्हिडीओ समोर आला असून या सर्वामुळे प्रकरणाला वेगळचं वळण बसलं आहे.

नुकतंच पुणे जिल्ह्यातील कदमाकवस्ती येथे महिला सरपंचाला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली होती. सुजित काळभोर असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव होतं. त्यानंतर आता एक नवा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये संबधित महिला गौरी गायकवाड यांनी आधी सुजितला श्रीमुखात लगावल्याचं दिसून येत आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात सर्वात आधी ही घटना समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने महिला सरपंचाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. संबंधित घटना ही पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली होती. या घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला असून हा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. पण आता एक नवा व्हिडीओ समोर आला असून दोन्ही बाजूने हाणामारी झाल्याचं दिसून येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI