चमकोगिरीचा किती तो सोस? बुचकेंची चमकोगिरी, सुनेत्रा पवारांचा अवमान

चमकोगिरीचा किती तो सोस? बुचकेंची चमकोगिरी, सुनेत्रा पवारांचा अवमान

| Updated on: Feb 22, 2026 | 11:06 AM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रोटोकॉल भंगाच्या दोन घटनांनी राजकीय वर्तुळात वाद निर्माण केला आहे. जुन्नरमध्ये भाजप नेत्या आशा बुचके यांनी मनोगतासाठी पुकारलेल्या सुनेत्रा पवारांना थांबवून माईक घेतला. तर रायगडमध्ये अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या शासकीय चालकाला उतरवून स्वतः गाडी चालवली. दोन्ही घटनांवरून टीकेची झोड उठली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रोटोकॉल भंगाच्या दोन स्वतंत्र घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग निर्माण केले आहे. भाजप नेत्या आशा बुचके आणि सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यावर प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप होत आहे.

जुन्नर येथे शिवजयंती कार्यक्रमात आमदार शरद सोनवणे यांनी सुनेत्रा पवारांचे नाव मनोगतासाठी पुकारले. त्यावेळी आशा बुचके यांनी माईक घेऊन परस्पर भाषण केले, ज्यामुळे सुनेत्रा पवार त्यांच्या पाठीमागे ताटकळत उभ्या राहिल्या. या प्रकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज झाल्याचे त्यांच्या हावभावांवरून दिसून आले. यापूर्वीही बुचके यांनी सुनेत्रा पवारांना धक्का दिल्याचा आणि कॅमेऱ्यात दिसण्यासाठी धडपड केल्याचा दावा व्हिडिओंच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आशा बुचके या भाजपच्या माजी झेडपी सदस्य असून, त्यांनी यापूर्वीही अजित पवारांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केल्याचा उल्लेख आहे.

दुसरीकडे, रायगडमध्ये अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या शासकीय चालकाला खाली उतरवून स्वतः गाडी चालवल्याचा प्रकार घडला. या घटनेवरही टीका होत असून, झेड प्लस सुरक्षा असताना तटकरेंना कोणत्या अधिकारात शासकीय वाहन चालवण्याची परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Published on: Feb 22, 2026 11:04 AM