Bachchu Kadu : नौटंकी जोडपं देशात मिळणार नाही, बायको भाजपात अन्… बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर निशाणा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील राजकीय वाद पुन्हा उफाळला आहे. रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी राणा दाम्पत्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजपच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला घेरले.
दिवाळीच्या उत्सवामध्ये राजकीय फटाकेही फुटताना दिसत आहेत. रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंना भेटल्याचा आणि आंदोलनाद्वारे सरकारवर दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. यावर बच्चू कडूंनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर पलटवार करताना म्हटले की, “तुमची बायको भाजपमध्ये आणि तुम्ही युवा स्वाभिमान संघटनेत, असे नौटंकी जोडपे देशात मिळणार नाही.” त्यांनी राणा दाम्पत्याच्या शेतकरी हिताच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तसेच भाजपवर टीका केली. भाजपने पूर्वी टीका करणाऱ्यांना पक्षात घेऊन लाचारी दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. बच्चू कडूंनी स्वतःच्या ताकदीवर लढत असल्याचे सांगत शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग हेच आपले दैवत असल्याचे स्पष्ट केले.
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

