Suraj Chavan | तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. चव्हाण म्हणाले की, “मोठ्या नेत्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध होण्याची महाराष्ट्रातील परंपरा आहे, परंतु काँग्रेसने ही परंपरा मोडीत काढली.”
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. चव्हाण म्हणाले की, “मोठ्या नेत्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध होण्याची महाराष्ट्रातील परंपरा आहे, परंतु काँग्रेसने ही परंपरा मोडीत काढली.” सुरज चव्हाण यांनी काँग्रेसने पार्थ पवारांविरुद्ध खालच्या भाषेत टीका केली असल्याबाबतही विधान केले आणि यावर योग्य उत्तर देण्याचा इशारा दिला. त्यांनी सांगितले, “काँग्रेसचे नेते आज जनभावनेपासून दूर गेले आहेत, म्हणून ताशा पद्धतीचं विधान पार्थ पवारांनी केलं होतं. आमच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका होत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, मात्र आम्हाला या प्रकारात खालच्या पातळीवर राजकारण करायचे नाही.” सुरज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यता दर्शवली आहे.
Published on: Apr 07, 2026 02:08 PM
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर

