Special Report | इंधन दर कपातीवरून राजकारण पेटलं
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांची कपात झाली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे सामन्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला, मात्र आता याच मुद्द्यावरून राजकारण देखील सुरू झाल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला मोठं गिफ्ट दिलंय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. या कपातीनंतर आता देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले आहेत. आजपासून नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे जनतेत एकप्रकारचा असंतोष होता. त्याचे पडसात पोट निवडणुकीच्या निमित्ताने पहायाला मिळाल्याची देखील चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांची कपात झाली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे सामन्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला, मात्र आता याच मुद्द्यावरून राजकारण देखील सुरू झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
