Special Report | Poonam Mahajan यांचा संताप, Sanjay Raut बॅकफूटवर?

संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका”, अशा शब्दात पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 25, 2022 | 9:37 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादामध्ये हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला (BJP) फटकारलं होतं. ठाकरे यांनी केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली होती. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजपतर्फे झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत पुढे आले. संजय राऊत यांनी देखील शिवसेना राम मंदिर आंदोलनात कुठं होती. राम मंदिराराच्या लढाईत शिवसेना नव्हती तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आरोपी कसं करण्यात आलं?, असा सवाल केला होता. संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. त्या व्यंगचित्रावरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका”, अशा शब्दात पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें