Amravati News : विश्रोळी धरणात प्रहारच्या कार्यकर्त्यांचं जलसमाधी आंदोलन
Prahar Activist Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विश्रोळी येथील जलाशयात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
अमरावतीच्या विश्रोळी धरणात प्रहारकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे जलसमाधी आंदोलन करण्यात आलं आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या विश्रोळी येथील जलाशयात आज जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गुरूकूंज मोझरी येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जलाशयात उड्या घेतल्या, असे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रहारचे पंधरा ते वीस कार्यकर्ते पूर्णा धरणाच्या जलाशयात घोषणा देत उभे आहेत.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

