Prajakta Mali Video : त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाच्या वादावर प्राजक्ता माळी स्पष्ट म्हणाली, ‘मनातले किंतू परंतू काढून टाकावेत, देवाच्या दारी..’
मंदिर विश्वस्तांकडून महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवस्तुती नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या कार्यक्रमाला आणि प्राजक्तामाळीच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना या संदर्भात पत्र दिलं आहे
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. मंदिर विश्वस्तांकडून महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवस्तुती नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या कार्यक्रमाला आणि प्राजक्तामाळीच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना या संदर्भात पत्र दिलं आहे. या पत्राद्वारे चुकीचा पायंडा पाडू नये अशी मागणी ललिता शिंदे यांनी केली आहे. ‘महाशिवरात्रीचा अतिशय पवित्र दिवस आहे. त्यामुळे या दिवशी धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल, तरीपण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे. पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने चालू केला आहे. ते चुकीचं आहे’, असं माजी विश्वस्त ललिता शिंदेंनी म्हटलं. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील वादावर प्राजक्ता माळीने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘महाशिवरात्री निमित्त होणारा हा कार्यक्रम संपूर्णतः शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या नृत्याचा कार्यक्रम आहे. अपुऱ्या माहितीमुळे कोणाला गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतू परंतू काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये’, अशी प्राजक्ता माळीने विनंती केली आहे. पुढे प्राजक्ताने असंही म्हटलं की, देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो. सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तीभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजाच्या चरणी रूजू करणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

