Prakash Ambedkar : स्वतःची इभ्रत स्वतः राखली पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा सरन्यायाधीश गवईंना सल्ला
Prakash Ambedkar on CJI : सरन्यायाधीश गवई यांच्या कार्यक्रमात एकही वरिष्ठ अधिकारी हजार नसल्याच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना सल्ला दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई येथे आल्यावर राज्याचे मुख्य सचिव किंवा इतर कोणी आले नाहीत, त्यांना नोटीस काढतील. कारण मुख्य न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते मुंबईत आले होते. त्यामुळे स्वतःची इभ्रत स्वतः राखली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबईतील सत्कार सोहळ्यात एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचे गवई यांनी याबद्दल खंत व्यक्त करत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती. या संपूर्ण प्रकरणावर आज प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत सरन्यायाधीश भूषण गवई यांना सल्ला दिला आहे. धारशिव येथे ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, मुख्य न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यामुळे स्वतःची इभ्रत स्वतःच राखली पाहिजे, त्या खुर्चीची गरिमा ठेवणार आहेत की नाहीत? न्यायाधीश गवई हे स्वतःच्या हिमतीने न्यायाधीश खुर्चीपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्र शासन काय करेल ते नंतर करेल. मात्र, त्यांनी नोटीस काढून पदाची प्रतिष्ठा राखावी, असं म्हणत एक प्रकारचा सल्लाच प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीशांना दिला आहे.