Pratap Sarnaik | मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात : सरनाईक

आज गोकुळ अष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे मोठे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ अंतर्गत हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 31, 2021 | 8:48 PM

ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे (Oxygen plant) लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झालं. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut), ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते. कोरोनाचे संकट पाहता, दहीहंडी उत्सव गर्दी करून मोठ्या प्रमाणात साजरी न करता त्याऐवजी जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी हा प्लांट उभारण्यात आला आहे. आज गोकुळ अष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे मोठे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ अंतर्गत हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें