नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार? भाजपच्या नेत्यानं दिले मोठे संकेत
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील असू शकतील, असं वक्तव्य भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. दरम्यान, प्रवीण दरेकरांनी नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई, १३ मार्च २०२४ : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याचा दावा राणा दाम्पत्य करत असताना अभिजीत अडसुळ सातत्याने राणा दाम्पत्यांवर टीका करत आहे. अशातच अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्या कमळावरच लढणार, त्यामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील असू शकतील, असं वक्तव्य भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. दरम्यान, प्रवीण दरेकरांनी नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर नवनीत राणा यांच्या पती रवी राणा यांनी भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू असे म्हटले. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये मोदीजी से बैर नहीं राणा तेरी खैर नही, अशी स्थिती असल्याचे अभिजीत अडसूळ यांनी म्हटले आहे. तर सात ते आठ वेळा त्या जागेवरती आमचा क्लेम राहिलेला आहे आम्ही त्या ठिकाणी जिंकून आलेलो आहोत आणि त्यामुळे यंदा देखील ही जागा आम्हीच लढवणार आहोत असा विश्वासही अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केला.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
