Atal Bihari 5th Death Anniversary : अटलजींना पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
यावेळी वाजपेयी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, प्रफुल्ल पटेल, जितनराम मांझी, अनुप्रिया पटेल, सुदेश महतो हेही उपस्थित होते.
नवी दिल्ली : 16 ऑगस्ट 2023 | देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो लोक, नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी अटलजींच्या समाधीचे अटल स्मारकावर दर्शन घेतले. यावेळी वाजपेयी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, प्रफुल्ल पटेल, जितनराम मांझी, अनुप्रिया पटेल, सुदेश महतो हेही उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाचा भारताला खूप फायदा झाला. भारताच्या अनेक क्षेत्रात प्रगती करण्यात आणि २१व्या शतकात नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या 140 कोटी जनतेसह मी अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करतो.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

