औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग; राजीनाम्याची मागणी
मध्यंतरी ते भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत होते. त्यांच्यावर जमिन घोटाळा, रेती घोटाळा आणि कृषीविभागाच्या धाडीवरून टीका झाली होती. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात छत्रपती संभाजी नगरमध्ये जोरदार आंदोलन केले जात आहे.
छत्रपती संभाजी नगर : कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आताही ते एका आंदोलनामुळे चर्चेत येत आहे. मध्यंतरी ते भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत होते. त्यांच्यावर जमिन घोटाळा, रेती घोटाळा आणि कृषीविभागाच्या धाडीवरून टीका झाली होती. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात छत्रपती संभाजी नगरमध्ये जोरदार आंदोलन केले जात आहे. तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावेळी सत्तारांनी अनेकांच्या जमिनी हडप केल्यात, शिवाय मंत्री झाल्यापासून त्यांचे जनतेवरील अत्याचार वाढलेत असा आरोप आंदोलकांनी केलाय. तर केलेल्या या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. यावेळी आंदोलन कर्त्यांनी सत्तारांविरोधात बनियनवर घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली. यामुळे आता आधीच अडचणीत सापडलेल्या सत्तारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

