बदलापूरातील आंदोलन राजकीय होते, पण गुन्हा दाखल झाला ना, उद्धव ठाकरे कडाडले
बदलापूरची संबंधित शाळा आरएसएस किंवा भाजपच्या संबंधित व्यक्तीची आहे अशी माहिती पुढे येत आहे.मला माहिती नाही पण तु्म्ही चौकशी करु शकता असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
बदलापूरात चिमुकल्या बालिकांवर अत्याचार झाल्याने नागरिकांनी रुळांवर उतरुन आंदोलन केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय लोकांनी आंदोलन केल्याची टिका केली आहे. यावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी जोरदार टिका केली आहे. बदलापूर प्रकरणात वेळीच पालकांची दखल घेतली असती आणि गुन्हा दाखल केला असता तर हा प्रसंग आला नसता. जनतेचा उद्रेक झाला तर त्यात राजकारण झालं असं म्हणणं योग्य नाही. आणि असले राजकीय लोक तरी या आंदोलनामुळे गुन्हा तरी दाखल झाला. आमच्या सुषमा अंधारे धरणे धरुन बसल्या म्हणून तर त्या वामन म्हात्रें वर गुन्हा दाखल झाला. जर आंदोलकांवरच गुन्हे दाखल करताय तर असं बघितल्यावर ‘आग लागो तुझ्या कारभाराला’ असंच म्हणायची वेळ आल्याचे उद्धव ठाकरे उद्वेगाने म्हणाले.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक

