MHADA Video : ‘मला हात लावला तर उडी घेईन’, 20 वर्षांपासून गरिबांना घरं नाही असा आरोप अन् ‘म्हाडा’ मुख्यालयात उधळल्या नोटा
शुक्रवारी दुपारी आंदोलक महिला दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे दालनात उधळले. या धक्कादायक प्रकारानंतर काहीतरी गौडबंगाल आहे? अशी चर्चा म्हाडात रंगली होती.
म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्याच्या दालनातच एका महिलेने चक्क नोटा उधाळल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. आंदोलक महिलेने पैसे उधळल्यानंतर म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्याच्या दालनाला पैशांचा हार देखील घातला. घडलेल्या प्रकारानंतर या महिलेला सुरक्षारक्षकांनी म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्याच्या दालनातून बाहेर काढलं. गेल्या २० वर्षांपासून गरिबांना घरं दिली नाहीत, असा या आंदोलक महिलेचा आरोप आहे. तर उमेश वाघ नावाच्या अधिकाऱ्यावर या आंदोलक महिलेने भ्रष्टाचाराचे आरोप करत दालनातच पैशाचा पाऊस पाडलाय. म्हाडाच्या बांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्निर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. दररोज साधारण पाच हजार लोक हे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात जात असतात, भेट देत असतात. अशातच हा सर्व प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. शुक्रवारी दुपारी आंदोलक महिला दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे दालनात उधळले. यावेळी संबंधित अधिकारी पाहणी दौऱ्यावर गेल्यामुळे दालनात ते हजर नव्हते. या दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय. या धक्कादायक प्रकारानंतर काहीतरी गौडबंगाल आहे? अशी चर्चा म्हाडात रंगली होती.