Pune Ambil Odha Protest | पुण्यात आंबिल ओढा कारवाईविरोधात पालिकेसमोर नागरिकांचा ठिय्या

पुण्यातील आंबिल ओढ्यातील (Pune Ambil Odha) काही नागरिकांची घरं पाडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने आंदोलन केलं. आंबिल ओढ्यातील नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या दिला. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

पुण्यातील आंबिल ओढ्यातील (Pune Ambil Odha) काही नागरिकांची घरं पाडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने आंदोलन केलं. आंबिल ओढ्यातील नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या दिला. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि आंबिल ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. महापालिकेविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. “मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद” अशा घोषणा चक्क सुप्रिया सुळे यांच्या समोरच दिल्या जात होत्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI