Pune Avinash Bhosale | उद्योजक अविनाश भोसलेंना दणका, ईडीकडून नागपूर, पुण्यातील मालमत्ता सील

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील वेस्टिन या पंचतारांकित हॉटेलमध्ये अविनाश भोसले यांचे काही शेअर्स होते. हे हॉटेलही ईडीकडून सील करण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI