Nashik News | नाशिक पुन्हा हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना…
राज्यभरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अलीकडेच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली. स्कूल व्हॅन चालकाने 9 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे पित्यानेच स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
नाशिकमध्ये एका खासगी स्कूल व्हॅन चालकानं नऊ मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. चालक मुलींना बसमध्ये चढवताना आणि उतरवताना अयोग्य स्पर्ष करत होता. अखेर भीतीपोटी सर्व मुलींनी व्हॅनमध्ये जाण्याचा नकार दिल्याने सर्व प्रकार उघड झाला.
दुसरीकडे पुण्यात जन्मदात्या पितानेच स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मुलगी घरी एकटी असताना वडिलानेच तिच्याबर बळजबरी केली. अखेर मुली धाडस दाखवत पोलीसांत तक्रार केली. तक्रारीनंतर पिंपरी चिचवड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
Published on: Apr 02, 2026 04:32 PM
Follow Us
Latest Videos
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी

