दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; नेमकं प्रकरण काय आहे?
Daund MLA Rahul Kool Money laundering Case : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी 500 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना तसं पत्र लिहिलं आहे. राहुल कुल यांच्यावरील आरोप नेमके काय आहेत? पाहुयात...
दौंड, पुणे : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी हे गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसं पत्रही लिहिलं आहे. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. वर्ष 2016-17 ला 26 कोटी 47 लाख 74 हजार. 2019-20 ला 29 कोटी 83 लाख 99 हजार. 2020-21 ला 38 कोटी 68 लाख 46 हजार 2021-22 ला 33 कोटी 13 लाख 80 हजारांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी राहुल कुल यांच्यावर केलेले आरोप नेमके काय आहेत? पाहुयात…
1. भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप
2. दौंडमधील भीमा साखर कारखान्याच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा आरोप
3. 2016 ते 2022 वर्षात खुल्या साखर साठ्याच्या विक्रीतून 160 कोटी 25 लाखांचा गैरव्यवहार
4. गळीत हंगाम बंद असताना परस्पर खुल्या साखर साठ्याची व्रिकीत करुन घोटाळा केल्याचा आरोप
3. 2014 ते 2016 वर्षात ऊस तोडणी वाहतुकीसाठी घेतलेल्या कर्जातून 50 कोटींचा घोटाळा
4. NCDCकडून कमी व्याज दरात 35 कोटी 90 लाखाचं कर्ज घेऊनही भीमा कारखाना भीकेस लावल्याचा आरोप
5. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेल्या कर्जातही घोटाळा झाल्याचा आरोप
6. गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट करण्यात राहुल कुल यांच्यासह हणमंत ढवळे, एस.एम बोरकरांच्या सहभागाचा आरोप
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

