पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ. घैसास यांचा राजीनामा
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय चांगलंच चर्चेत आलं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रूग्णालय प्रशासनाविरोधात एकच संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ.धनंजय केळकर यांच्याकडे सोपावला आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या मुजोरपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबीयांकडे उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वी दहा लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांकडे अडीच ते तीन लाख रूपये असून त्यांनी ते भरण्याची तयारी दाखवल्यानंतरही रूग्णावर उपचार सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळेच रूग्णाचा मृत्यू झालाचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालातही रूग्णालयालाच रूग्णाच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यात आले आहे.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन

