AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातून मोठी बातमी! ससून रुग्णालयात हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात एक पोलीसही जखमी

पुण्यातून मोठी बातमी! ससून रुग्णालयात हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात एक पोलीसही जखमी

| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Sep 06, 2022 | 9:25 AM
Share

Pune crime News : हिंदू राष्ट्र संघटनेचे तुषार हंबीर यांच्यावर ससून रुग्णालयात हल्ला करण्यात आला. तुषार हंबीर यांच्यावर पोलीस संरक्षणातच हल्ला करण्यात आल्यानं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. तुषार हंबीर हा स्वतः एका आरोपी आहे. तो सध्या येरवडा कारागृहात मोक्का गुन्ह्याखाली अटकेत आहे.

पुणे : पुण्यात ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. पुण्यात (Pune crime news) हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हिंदू राष्ट्र संघटनेचे तुषार हंबीर (Tushar Hambir) यांच्यावर ससून रुग्णालयात हल्ला करण्यात आला. तुषार हंबीर यांच्यावर पोलीस संरक्षणातच हल्ला करण्यात आल्यानं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. तुषार हंबीर हा स्वतः एका आरोपी आहे. तो सध्या येरवडा कारागृहात मोक्का गुन्ह्याखाली अटकेत आहे. तुषार हंबीर याला काल उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याचवेळी चार जणांनी तुषार हंबीर यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. सध्या या गोळीबार प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र ससून रुग्णालयात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनं इतर रुग्णांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

Follow Us
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

Petrol Diesel Rate: युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, पहिल्या तिमाहीत मोठा तोटा, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार?.

Petrol Diesel Rate: युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, पहिल्या तिमाहीत मोठा तोटा, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार?

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य