चंद्रकांत पाटील याचं भर कार्यक्रमात असं कृत्य ज्यामुळे वारकऱ्यांची टाळ थांबली; काय झालं कार्यक्रमात
पुण्यातील एका वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला पाटील यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी वारकऱ्यांना खूश करण्यासाठी आपल्या गळ्यातील तुळशीची माळ दाखवली.
पुणे : तुळशीची करिता सेवा | होय देवा प्रिय तो || संत एकनाथ महाराजही सांगतात की, बाबांनो तुम्हाला जर देवाला प्रिय व्हावे असे वाटत असेल तर इतर कोणत्याही साधनांची खटाटोप करू नका तुळशीची सेवा करा याचं प्रमाणे आपणही तुळशीची सेवा करतो, ती गळ्यात घालतो असेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कृतीतून वारकऱ्यांना सांगितलं आहे. पुण्यातील एका वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला पाटील यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी वारकऱ्यांना खूश करण्यासाठी आपल्या गळ्यातील तुळशीची माळ दाखवली आणि जगद्गुरू तुकोबाराय यांच्या सांगण्याप्रमाणे भगवंताच्या नामाचे चिंतन आणि गळ्यात तुळशीची माळ हीच गोष्ट देवाला खुप आवडते. म्हणून देवाला आवडण्यासाठी वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतो तसाच मी घालतो असे सांगण्याचं प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीचा व्हीडोओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर त्यांच्या या कृतीमुळे वारकऱ्यांच्यात एकच खसखस पिकली होती.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

