पुण्याच्या लक्ष्मी रोडवर सामानासह Bike उचलण्याचा प्रकार, Police कारवाईदरम्यानची घटना

पुण्याच्या लक्ष्मी रोडवर सामानासह Bike उचलण्याचा प्रकार, Police कारवाईदरम्यानची घटना

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 9:30 AM

पुणे शहरातील सुप्रसिद्ध लक्ष्मी रोडवर सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. पार्किंगच्या बाहेर दुचाकी लावून दोघे जण खरेदीसाठी गेले होते. तेवढ्यात वाहतूक पोलिसांची गाडी नो पार्किंग किंवा पार्किंगच्या पांढर्‍या पट्टीबाहेर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी आली.

पुणे : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) नो पार्किंगमध्ये (No Parking) उभ्या केलेल्या दुचाकींवर कारवाई केली. यावेळी एक दुचाकी सामानासह उचलल्याचं पाहायला मिळालं. आमच्या सामानाचं नुकसान झालं, आमची गाडी सोडा, असा आरडाओरडा दुचाकी मालकांनी केला. त्यानंतरही पोलीस गाडी सोडायला तयार नव्हते. मात्र या प्रकाराचं व्हिडीओ शूट होत असल्याचं समजल्यावर पोलिसांनी स्कूटर सोडल्याचा दावा केला जात आहे. स्कूटरवर ठेवलेल्या साहित्यासह गाडी उचलतानाचा व्हिडीओ (Bike Tow) समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

Follow Us