Pune Porsche Accident : पुण्यातील हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं….
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी महत्त्वपूर्ण अपडेट दिली. तर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे पुण्यातील अपघात प्रकरणावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी महत्त्वपूर्ण अपडेट दिली. तर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे पुण्यातील अपघात प्रकरणावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघात प्रकरणात राजकीय दबावापासून पोलिसांच्या तपासासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अखेर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. या केसमध्ये कोणताही दबाव आला किंवा दिरंगाई झाली असं म्हणणं योग्य नसल्याचे सांगत त्यांनी रवींद्र धगेंकराच्या आरोपांवर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. तर अपघात घडला तेव्हा तो अल्पवयीन मुलगा नव्हे तर ड्रायव्हरच गाडी चालवत होता असा दावा अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी केला आहे. यावर बोलताना आयुक्त म्हणाले, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला होता म्हणून या प्रकरणात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच कलम लावण्यात येत आहे, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलं.