DCP Case | ‘बिर्याणीच्या ऑर्डरची ती ऑडिओ क्लिप हे षडयंत्र’, पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना हा प्रकार गंभीर आहे. याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर झोन 1 च्या डीसीपी प्रियंका नारनवरे यांनी ही ऑडिओ क्लिप म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप टीव्ही 9 शी बोलताना केलाय.

पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या मॅडम मटण बिर्याणीची ऑर्डर आणायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांना ही बिर्याणी फुकट हवी आहे. आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे देण्याची गरज काय? असंही त्या आपल्या कर्मचाऱ्यांना सांगताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना हा प्रकार गंभीर आहे. याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर झोन 1 च्या डीसीपी प्रियंका नारनवरे यांनी ही ऑडिओ क्लिप म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप टीव्ही 9 शी बोलताना केलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI